बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांचा ६२ वा वाढदिवस आज लखनऊमध्ये साजरा करण्यात आला. या वाढदिवसासाठी त्यांना वैयक्तिक भेटून शुभेच्छा देण्यासाठी ५० हजार रूपये फी ठेवण्यात आली आहे. पक्षाची कामगिरी २०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर सातत्याने घसरत आहे. लोकांचा या पक्षाचा जनाधार ही काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा निम्याने ही फी कमी करण्यात आली आहे. मागल्या वर्षी त्यांना वैयक्तिक भेटून शुभेच्छा देण्यासाठी १ लाख रूपये द्यावे लागत होते.आजचा दिवस पक्षाकडून 'आर्थिक सहयोग दिवस' म्हणून साजरा केला जातो. १९९५ साली उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या नावे हा निधी फंड तयार करण्यात आला आहे. यामध्ये पैशाशिवाय सोने, चांदी, हिरे या स्वरूपातही भेट स्वीकारली जाते, त्याचा या फंडात समावेश केला जातो. या फंडात २००४ साली जमा झालेली एकूण रक्कम ११ कोटी रूपये इतकी होती. त्यानंतर २०१२ मध्ये ही रक्कम तब्बल ११२ कोटी इतकी झाली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews